पुणे महानगर परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत बसभाडेवाढीला मंजुरी दिली आहे. आता सहा किलोमिटर पुढे पीएमपी बसच्या दरामध्ये पाच ते तब्बल २५ रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, शनिवारपासून ही भाडेवाढ लागू होणार असून त्यामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत. ही अन्यायी दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात येत असून प्रवासी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत.