पुण्यातील लाखो बसप्रवासी ‘बचावले’

शनिवार, 22 नोव्हेंबर 2014 (12:45 IST)
पीएमपीएमएलची प्रस्तावित केलेल्या भाडेवाढीवर सर्वस्तरातून विरोध झाल्यानंतर हा प्रस्ताव परिवहन समितीस मागे घ्यावा लागला. तिकीटामध्ये प्रस्तावित केलेली तब्बल २० टक्के भाढेवाढ समितीने अमान्य केल्याने पुण्यातील लाखो बसप्रवासी भाडेवाढीच्या संकटातून ‘बचावले’ आहेत.
 
गेल्या अनेक वर्षांपासून पीएमपीएमएल तोट्यात आहे. उत्पन्न आणि खर्चामध्ये ताळमेळ नसल्याने मोठी तूट भरुन काढण्यासाठी पीएमपीएमएलने प्रवासी भाड्यात तब्बल २० टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव समितीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवला होता. त्यावर चर्चा करुन तो  जिल्हा परिवहन प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. मात्र, याला सर्वस्तरातून विरोध झाला. मुळात पीएमपीएमएलची सेवा सुधारण्याची गरज असताना भाडेवाढ करुन प्रवाशांवर अन्याय केला जात असल्याची भूमिका मांडत सर्वस्तरातून यास विरोध झाला.
 
दरम्यान, पीएमपीएम कोणतेही सक्षम कारण देण्यात आलेले नाही, असे सांगत प्राधिकरणाने हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

वेबदुनिया वर वाचा