पंढरपूरातील विठ्ठल मंदिराची समिती बरखास्त

शुक्रवार, 12 जून 2015 (10:51 IST)
पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या कारभाराची सूत्रे जिल्हाधिकार्‍यांकडे सोपवून अस्थायी समिती गुरुवारी बरखास्त करण्याचा निर्णय विधी व न्याय मंत्रालयाने याबाबतचा निर्णय घेतला आहे़ सध्याची अस्थायी समिती बरखास्त करून नवीन १२ सदस्यांची स्थायी समिती स्थापन करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारला दिले होते. मात्र, शासनाकडून स्थायी समिती नेमण्यात आली नव्हती.

दरम्यान, समितीचे अध्यक्ष आण्णा डांगे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर समिती बरखास्त करण्याच्या हालचालींना वेग आला होता.

वेबदुनिया वर वाचा