नेमाडे म्हणाले ‘हा तर पुन्हा फाळणीचा डाव’

बुधवार, 2 सप्टेंबर 2015 (11:29 IST)
औरंगाबाद शहराचे नाव बदलणे म्हणजे इतिहास बदलण्यासारखे आहे. असले उद्योग करण्यापेक्षा तेथील लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणी देण्याचा प्रयत्न करा, असे मत व्यक्त करतानाच सरकारचे धोरण म्हणजे पुन्हा फाळणीच्या डावासारखेच आहे, असा आरोप ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केले.

ते म्हणाले, मी बोललो की वाद होतो, पण मी स्वत:हून बोलत नाही. कुणी प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर मी देतो. साहित्य क्षेत्रातला दहशतवादी असल्याचा आरोप माझ्यावर केला जातो पण, असा आरोप करणारे लोकच भित्रे आहेत.

राज्यात विचारवंतांच्या हत्या होत असल्याबाबत चिंता व्यक्त करताने ते म्हणाले, हे तालिबान आहे की पाकिस्तान? मी स्पष्ट बोलतो म्हणून मलाही ठार कराल का?.

वेबदुनिया वर वाचा