निम्हण यांचा कॉँग्रेसला ‘जय महाराष्ट्र’

गुरूवार, 29 जानेवारी 2015 (11:56 IST)
माजी आमदार विनायक निम्हण यांनी कॉँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निम्हण यांना पुणे शहरप्रमुखपदाची जबाबदारी दिली आहे.

माजी मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्या वेळी त्यांच्या सोबत काही शिवसेना नेते आणि कार्यकर्ते गेले होते, त्यांच्यात निम्हण यांचा समावेश होता. 

वेबदुनिया वर वाचा