झेलुबाई जगन्नाथ वाबळे (65) असे पीडित महिलेचे नाव असून ती घरासमोरील ओट्यावर गुरुवारी रात्री आठच्या सुमारास बसली होती. गावातील अशोक सोपान बोरनारे, पांडुरंग सोपान बोरनारे, नंदकिशोर विश्वनाथ भुरक हे झेलुबाई यांच्या घरी गेले. आम्ही तुला तीन नंबरचे बटन दाबून मतदान करण्यास सांगितले होते, तू दोन नंबरचे बटन दाबले का असा जाब विचारत तिच्या अंगावर रॉकेल टाकून जाळले. यात झेलूबाई या 60 टक्के भाजल्या असून, त्यांना उपचारासाठी ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.