नाशिकच्या महापौरपद राखण्यात राज ठाकरे यांच्या मनसेला यश मिळाले आहे. मनसेचे उमेदवार अशोक मुर्तडक यांची शुक्रवारी महापौरपदी निवड झाली. अपक्ष नगरसेवक गुरमित बग्गा यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. मनसेला अपक्षांनी पाठिंबा दिला असून, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीने मनसेला बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
मनसेच्या शशिकांत जाधव, अशोक मुर्तडक, सुदाम कोंबडे, सलीम शेख या चौघांनी अर्ज दाखल केले होते. अंतिम क्षणी राज ठाकरे यांनी अशोक मुर्तडक यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला.