पुणे- गेले अनेक दिवस शिवसेना-भाजपमध्ये सुरू असलेली धुसमूस तीव्र होत असताना शिवसेनेसोबत असलेले आपले मतभेद ताबडतोब संपवून टाका, असा वडिलकीचा सल्ला केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी पक्ष कार्यकत्र्यांना राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत दिला. परंतु, राज्यातील भाजप नेत्यांनी नायडू यांचे हे आवाहन परतवून लावले आहे. आगामी मुंबई महानगरपालिका आणि अन्य निवडणुका भाजपने स्वतंत्रपणे लढल्या पाहिजेत, असे भाजप नेते आणि कार्यकत्र्यांचे म्हणणे आहे.