दुसरी पत्नी बेकायदाच!

गुरूवार, 11 फेब्रुवारी 2016 (11:14 IST)
दुसर्‍या पत्नीला कायदेशीर पत्नीचा दर्जा दिला जाणे अशक्य असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिल्याने दुसरी पत्नी करणे बेकायदाच ठरणार आहे.
 
पतीच्या मृत्यूपश्चात दुसरी पत्नी कुटुंब निवृत्तिवेतनावर दावा करू शकत नाही, असा निवार्ळा उच्च न्यायालयाने दिला आहे. पहिला विवाह अस्तित्वात असताना दुसरा विवाह करणे, बेकायदेशीर असल्याचे भारतीय विवाह संस्थेमध्ये ठरवण्यात आले आहे. त्यामुळे दुसर्‍या पत्नीला कायदेशीर विवाह केलेल्या पत्नीचा दर्जा देणे अशक्य असल्याचे न्या. मृदूला भाटकर यांच्या खंडपीठाने मंगळवारी म्हटले. कायदेशीररीत्या केलेला विवाह अस्तित्वात असताना दुसरी पत्नी पतीच्या पश्चात त्याची विधवा म्हणून कुटुंब निवृत्तिवेतनावर दावा करू शकत नाही, असेही न्या. भाटकर यांनी स्पष्ट केले आहे.

वेबदुनिया वर वाचा