दुष्काळातून निघणार ‘महामार्ग’

शनिवार, 26 डिसेंबर 2015 (10:37 IST)
सांगली : दुष्काळात होरपळणार्‍या शेतकर्‍यांसाठी अखेर केंद्र शासनाने ‘मार्ग’ काढला आहे.  गुहागर-विजापूर आणि मनमाड-बेळगाव या दोन राष्ट्रीय महामार्गांच्या प्रस्तावाला केंद्रीय रस्ते वाहतूक व दळवळणमंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. जिल्ह्याच्या दुष्काळी टापूतून हे महामार्ग जाणार असल्याने शेती व उद्योगांच्या विकासाला गती येणार आहे.
 
याबाबत माहिती देताना खासदार संजय पाटील म्हणाले, या भागात माळरान खूप आहे. माण, खटाव, खानापूर, जत, विटा, तासगाव परिसरातील पडीक शेती औद्योगिक वापरात आणायची असेल, उद्योगधंदे वाढायचे असतील तर दळणवळणाच्या उत्तम सुविधांना पर्याय नाही. त्यामुळे मनमाड, नगर, दौंड, बारामती, फलटण, दहीवडी, विटा, तासगाव, काकडवाडी, सुभाषनगर, चिकोडी, बेळगाव हा महामार्ग महत्त्वाचा ठरेल.
 

वेबदुनिया वर वाचा