दाभोळ प्रकल्पातून पुन्हा धावणार वीज

गुरूवार, 1 ऑक्टोबर 2015 (13:37 IST)
दाभोळ येथील बंद पडलेला वीजप्रकल्प सुरु होण्यासाठी एक नोव्हेंबरचा मुहूर्त काढण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पामधून 500 मेगावॉट वीज मिळणार आहे. केंद्रीय ऊजार्मंत्री पीयूष गोयल यांनी याबाबत माहिती दिली.

गॅसपुरवठ्याअभावी दाभोळ  प्रकल्प गेल्या वर्षी जानेवारीमध्ये बंद पडला होता. या प्रकल्पावर मालकी हक्क असलेल्या रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रा. लि. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होऊन त्यात विविध प्रलंबित विषय मार्गी लावण्यात आले आणि वीज उत्पादन सुरू करण्यावरही सहमती झाल्याचे मंत्री गोयल यांनी सांगितले. दाभोळ वीज प्रकल्पाबाबतची अनेक वर्षांपासूनची अनिश्चितता यानिमित्ताने संपुष्टात येणार असून, संचालक मंडळाने सर्व प्रलंबित विषय मार्गी लावले आहेत.

वेबदुनिया वर वाचा