दाभोलकर हत्याप्रकरण: दोन्ही आरोपींना जामीन

मंगळवार, 22 एप्रिल 2014 (11:58 IST)
अंधश्रद्धानिर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्येप्रकरणी अटक केलेल्या दोन्ही आरोपींना सोमवारी जामीन मंजूर करण्‍यात आला.

मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल अशी दोन्ही आरोपींना नावे आहेत. दोन्ही आरोपींच्या विरोधात ठोस पुरावे नसल्यामुळे जामीन मंजूर करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल (रा.इचलकरंजी, जि.कोल्हापूर) या दोघांना डॉ.दाभोलकर हत्याप्रकरणी गेल्या 20 जानेवारीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली होती. दरम्यान, मुंब्रा पोलिसांनी विकास खंडेलवाल याच्याकडून पिस्तूल जप्त केले होते. 

खंडेलवाल याला हे पिस्तूल मनीष नागोरी यानेच दिले असल्याचे निष्पन्न झाले असून तशी कबुलीही नागोरी याने दिली आहे, असे पोलिसांनी कोर्टात सांगितले. परंतु, दाभोलकर यांच्या हत्येसंबंधी कोणतेही ठोस पुरावे, नसल्याने कोर्टाने दोघांनाही जामीन मंजूर केला.

वेबदुनिया वर वाचा