पोलिस सूत्रांनुसार, सगळे आरोपी पीडित मुलीच्या घराशेजारी राहतात. पीडिता अंघोळ करतानाचा आरोपी शिवाजीने व्हिडिओ तयार केला होता. हा व्हिडिओ इंटरनेट आणि सोशल साइट्सवर अपलोड करण्याची धमकी देऊन तो तिला ब्लॅकमेल करत होता. आरोपीने तिला धमकावून त्याच्या मित्राच्या रुमवर नेले. तिथे आरोपी शिवाजीचे प्रसन्नकुमार आणि श्रीकांत हे दोन मित्र आधीच उपस्थित होते. या तिघांनी तिच्यावर बलात्कार केला.
मात्र, आरोपींच्या वारंवार होणार्या लैंगिक जाचाला कंटाळून पीडितेने तीन दिवसांपूर्वी स्वतःच्या घरातून पळून गेली होती. परंतु आरोपींनी तिला शोधून काढले. परंतु अखेर पीडितेने आई आणि मोठ्या बहिणीला आपबिती कथन केली. पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.