हाजी अली दर्गा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली होती. मात्र तरीही तृप्ती देसाई या हाजी अली परिसरात दाखल झाल्या. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे निर्माण झाल्यामुळे अखेर तृप्ती देसाईंनी काढता पाय घेतला.