अंजली पाटेदार वाकड मधील मदर केअर या रुग्णालयात बसल्या असताना चारित्र्याच्या संशयावरुन अभियंता मनोजने अंजली यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. या वादाचं रूपांतर हत्येत झालं. मनोजने अंजली यांच्या डोक्याला बंदूक लावून त्यांची हत्या केली. मनोजने घटनास्थळावरून पळ काढला मात्र वाकड पोलिसांनी त्याला कात्रज परिसरात गाठून बेड्या ठोकल्या.