जीवंत नागाच्या पुजेसाठी कायद्यात बदल : जावडेकर

सोमवार, 6 जुलै 2015 (10:45 IST)
बत्तीस शिराळा (जि. सांगली) येथील नागपंचमी साजरी करण्याची परंपरा पुन्हा सुरु करण्यासाठी अर्थात जीवंत नागाच्या पुजेसाठी वाइल्ड लाइफ कायद्यातील तरतुदींमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

बत्तीस शिराळा येथे नागपंचमीला जिवंत नागांना पकडून त्यांच्या स्पर्धा घेतल्या जात होत्या. तसेच जीवंत नागांची पूजाही करण्यात येते.

त्याविरोधात निसर्गप्रेमींनी जनहित याचिका दाखल केली होती. वाइल्ड लाइफ कायद्यातील तरतुदींना अनुसरून शिराळा येथे जिवंत नागांची पूजा करण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यामुळे  नागपंचमी साजरी करण्याची येथील अनेक वर्षांची परंपरा बंद झाली आहे. ती पूर्ववत करण्याकरिता या कायद्यामध्येच बदल करू, अशी ग्वाही जावडेकर यांनी  दिली.

वेबदुनिया वर वाचा