चेंबूरमध्ये दरड कोसळून पाच वर्षीय मुलाचा मृत्यू

गुरूवार, 31 जुलै 2014 (18:01 IST)
मुंबईतील चेंबूरमध्ये गुरूवारी सकाळी दरड कोसळून एका लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. चेंबूरमधील अशोक नगर परिसरात सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. अचानक दरड कोसळली आणि त्या खाली गणेशकुमार कुर्‍हाडे हा पाचवर्षीय चिमुकला मातीच्या ढिगार्‍याखाली गाडला गेला. त्याला तातडीने बाहेर काढण्यात आले. कुर्ला येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. 

वेबदुनिया वर वाचा