चिक्कीचा पुरवठा थांबविण्याचे आदेश

बुधवार, 16 सप्टेंबर 2015 (11:28 IST)
चिक्कीत दोष आहे, असे नाही मात्र, यावरुन गोंधळ सुरु असल्याने चिक्कीचा पुरवठा करू नका, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत.

चिक्कीत दोष असतानाही सरकारने याचे वितरण केले, असा अर्थ होत नाही मात्र, यावरुन गोंधळ सुरु असल्याने जनहितार्थ आम्ही हे आदेश दिले आहेत, असे न्या. व्ही. एम. कानडे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

अहमदनगर येथील चिक्कीत दोष असल्याचा निष्कर्ष तेथील स्थानिक प्रयोगशाळेने काढला होता. मात्र पुणे येथील प्रयोगशाळेने चिक्कीत दोष नसल्याचे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

वेबदुनिया वर वाचा