चहावल्याच्या मदतीने नाना हेलावला

बुधवार, 16 सप्टेंबर 2015 (11:23 IST)
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी धावलेला नाना पाटेकर ‘नाम’ फाउंडेशनच्या नोंदणीसाठी धर्मदाय सहआयुक्त कार्यालयात आला आणि नानाचा संकल्पाला सलाम करीत तेथे चहा देण्यासाठी आलेल्या विक्रेत्याने दोन हजार रुपयांची मदत नानाकडे सुपूर्त केली. चहावल्याच्या या कृतीमुळे नाना हेलावून गेला.

अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकाराने दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. लोकांनीही यामध्ये सहभागी होण्यासाठी ‘नाम’ फाउंडेशन या धर्मदाय संस्थेची स्थापना केली असून, संस्थेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांसाठी निधी उभारण्यात येणार आहे. या संस्थेची नोंदणी करण्यासाठी नाना पाटेकर धर्मदाय सहआयुक्त कार्यालयात पोहोचल्यानंतर अनेकांनी तेथेच त्यांच्याकडे पैसे सोपविले.

धर्मदाय सहआयुक्त कार्यालयात चहा घेऊन येणाºया चहावाल्यानेही तातडीने पाटेकर यांच्याकडे दोन हजार रुपयांची मदत सुपुर्द केली.

वेबदुनिया वर वाचा