घरमालकाची विजचोरी गेला भाडेकरूचा जीव

गुरूवार, 15 सप्टेंबर 2016 (17:06 IST)
विजचोरी एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो हे समोर आले आहे. विज चोरून वापरणाऱ्या घरमालकाच्या निष्काळजीपणामुळे भाडेकरूला आपला जीव गमवावा लगल्याची घटना समोर आली आहे.
 
नाशिक येथील औद्योगिक परीसारतील अंबड लिंक रोडवर कपडे वाळत घालणार्‍या महिलेचा विजेचा जोरदार  धक्का लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे 
 
अंबड लिंकरोडवरील दातीर मळा परिसरातील रहिवासी भाडेकरू सुलेखादेवी दीपक सिंग या कपडे वाळत घालत होत्या. त्यासाठी नेहमीप्रमाणे त्यांनी घराच्या जवळून जाणार्‍या वायरीवरच कपडे वाळत घातले. मात्र ही वायर जीवघेणी ठरली  या तारेतून विजप्रवाह सुरू होता. तो विजप्रवाह धुतलेल्या ओल्या  कपड्यांमधून सुलेखादेवी यांच्या शरीरात वीजप्रवाह उतरला होता. तर विजेचा जोरदार  धक्का लागल्याने सुलेखा देवी (३२ ) यांचा मृत्यू झाला. अंबड पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यावेळी विजेची वायर अनधिकृत असल्याचा संशय पोलिसांना आला होता. त्यांनी सखोल चौकशी केली असता दत्तू अर्जुन दातीर (रा. दातीर मळा) यांच्या अधिकृत वीजजोडणीमधूनच अनधिकृत वीजजोडणी घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे. यामुळे पोलिसांनी दत्तू दातीर यांच्याविरोधात हयगय व निष्काळजीपणामुळे सुलेखाबाई यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

वेबदुनिया वर वाचा