घरकुल घोटाळा:सुरेश जैन यांची पॅरोलवर सुटका

मंगळवार, 22 जुलै 2014 (15:20 IST)
जळगाव महापालिकेतील बहुचर्चित घरकुल घोटाळ्यातील  संशयित आरोपी आणि शिवसेनेचे आमदार सुरेश जैन यांची सोमवारी  सोळा दिवसांच्या पॅरोलवर सुटका झाले. जैन तब्बल सहा महिन्यांनी तुरुंगाबाहेर आले.
 
धुळे विशेष कोर्टाने जैन यांना 21 जुलै ते 6 ऑगस्टपर्यंत वैदकीय  रजा मंजूर केली आहे. 16 जानेवारीपासून जैन धुळे कारागृहात  आहेत.

दरम्यान, जळगाव महापालिकेतील कथित कोट्यवधींच्या घरकूल  घोटाळ्यातील संशयित आरोपी म्हणून सुरेश जैन यांना अटक केली  आहे. जळगावाचे तत्कालीन अप्पर पोलिस अधिक्षक इशू सिंधू यांनी  जैन यांना अटक केले होते.

वेबदुनिया वर वाचा