गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी 51 लाखांचा निधी

गुरूवार, 28 ऑगस्ट 2014 (11:47 IST)
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे जागदरी येथे स्मारक उभारले जाणार आहे. या स्मारकासाठी खासदार निधीतून 51 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा शिवसेनेच खासदार प्रताप जाधव यांनी केली. 
 
जागदरी  येथील संत श्री शंकरबाबांच्या संस्थान परिसरात गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारण्यात यावे, असा प्रस्ताव ग्रामस्थांनी मांडला होता. आमदार आणि मुंडे यांच्या कन्या पंकजा पालवे यांनी  हे स्मारकासाठी पुढाकार घेतला होता.पंकजा मुंडे गुरुवारी याच ठिकाणाहून आपल्या संघर्ष यात्रेला सुरुवात करणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा