खडसे यांना फेसबुकवरुन धमकी

मंगळवार, 16 फेब्रुवारी 2016 (14:01 IST)
महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना फेसबुकवरुन धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. फेसबुकवरील एका ग्रुपवर धमकीचा हा मेसेज भाजप कार्यकर्त्याच्या लक्षात आल्यावर त्याने भाजपच्या जेष्ठ कार्यकर्त्यांच्या कानावर ही बाब घातली गेली. आमदार सुरेश उर्फ राजू मामा भोळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयात निवेदन देऊन या घटनेच्या विरोधात तक्रार नोंदविली आहे.पोलिसांनी या घटनेचा तातडीने तपास करावा तसेच आरोपींना त्वरित अटक करावी, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी केली आहे.

वेबदुनिया वर वाचा