खंडोबाच्या नावानं चांगभल....

शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2014 (11:09 IST)
मागशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून सुरू झालेल्या चंपाषष्ठी महोत्सवाची गुरुवारी जेजुरीत सांगता झाली. हजारो भाविकांनी खंडोबादेवाचे दर्शन घेतले.
 
सकाळी मानाची पूजा झाल्यावर दर्शनासाठी भाविकांनी मोठी रांग लावली होती. पेटते दिवटे घेऊन गडावर हजारो भाविकांनी तळी-भंडारा करून भंडार-खोब:याची उधळण केली. खंडोबाला वांग्याचे भरीत-रोडगा, पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला खंडोबाने मणिसुर व मल्लासुर या दैत्यांचा वध केला व लिंगद्वरूपाने देव प्रगट झाले, अशी आख्यायिका आहे. म्हणूनच येथे देवाच्या दर्शनासाठी मोठी यात्रा भरते.

वेबदुनिया वर वाचा