कोल्हापूरात कर्नाटकच्या बसेसची तोडफोड

शनिवार, 26 जुलै 2014 (10:26 IST)
कर्नाटकातील बेळगावजवळच्या येळ्ळूरमधील  महाराष्ट्र राज्य लिहिलेला फलक काढून टाकल्याचे वाईट पडसाद शुक्रवारी कोल्हापुरात उमटले. कर्नाटक प्रशासनाच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी कोल्हापुरात बसेसची तोडफोड केली. या आंदोलनाचे नेतृत्त्व शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.  
 
कर्नाटक हायकोर्टाच्या आदेशानंतर येळ्ळूर गावच्या पंचायतीवरचा भगवा झेंडा काढण्य़ात आला होता. तसेच येळ्ळूरच्या सीमेवर असणारे महाराष्ट्राचे फलक प्रशासनाने निकाल येण्याआधीच काढून टाकला. त्यामुळे शिवसेनेन हे आंदोलन केले . 
कर्नाटक सरकारची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही. सीमाभागातील मराठी भाषीकांची गळचेपी होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. 
 
येळ्ळूर गावाच्या सीमेवर 1956 पासून महाराष्ट्र राज्याचा फलक आहे. मात्र, हायकोर्टाचा निकाल येण्याआधीच कर्नाटकने तो काढून टाकला. 27 जुलैला याबाबत याबाबत निकाल येण्याची शक्यता आहे. गावाच्या पंचायतीवर असलेल्या भगवा झेंडा काढण्याचे आदेश कर्नाटक हाय कोर्टाने दिले आहेत. 

वेबदुनिया वर वाचा