कोकणी साहित्‍याला ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

वेबदुनिया

रविवार, 23 नोव्हेंबर 2008 (12:30 IST)
ज्‍येष्‍ठ कोकणी साहित्यिक रवींद्र केळेकर आणि संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक सत्यव्रत शास्त्री यांना 2006 सालचा ४२ वा ज्ञानपीठ पुरस्कार संयुक्तपणे जाहीर झाला आहे. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा हा पुरस्‍कार समजला जातो.

कोकणी आणि संस्कृत साहित्‍याला 'ज्ञानपीठ' मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतीय 'ज्ञानपीठ' पुरस्काराच्या निवड समितीने शनिवारी सायंकाळी ही घोषणा केली आहे. 'आमची भाषा कोंकणीच', 'शाळेत कोंकणी कित्याक', 'बहुभाषिक भारतान्त भाषेचो समाजशास्त्र' आणि 'हिमालयान्त' आदी त्यांच्या गाजलेल्या साहित्यकृती आहेत. कोकणी भाषा मंडळाच्या उभारणीतही त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

वेबदुनिया वर वाचा