कॅन्सरवर मात करणार्‍या महिलांसाठी डाबरचा उपक्रम

सोमवार, 23 फेब्रुवारी 2015 (13:59 IST)
कॅन्सरसारख्या विकारावर मात करणार्‍या महिलांसाठी डाबर वाटिकाच्यावतीने ब्रेव्ह व ब्युटीफुल हा उपक्रम हाती घेतला आहे, असे टिनी सेनगुप्ता यांनी पत्रकारांना सागितले. 
 
त्या म्हणाल्या, ज्या महिलांनी आपल्या इच्छाशक्तीच्या आधारावर या विकारावर मात केली आहे. त्यांची माहिती इतर महिलांना मिळावी यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी टेबल बुक तयार करण्यात येणार आहे. ज्या महिलांना हा आजार झाला आहे त्यांना नवी उमेद मिळावी. उपचार करताना केमोथेरपीची गरज असते. त्यावेळी केसाची हानी होते. या सर्व बाबीची माहिती देण्यासाठी एक लघुपट तयार केला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. 
 
डाबर वाटिका ही कंपनी 95 मध्ये सुरू झाली. त्याची वर्षाची उलाढाल 1000 कोटी इतकी झाली आहे. तसेच नवीन उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत असे त्यांनी सागितले.

वेबदुनिया वर वाचा