कसारा घाटात 25 मीटर लांबीचा रस्ता खचला

शुक्रवार, 1 ऑगस्ट 2014 (11:33 IST)
मुंबईसह नाशिकमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कसारा घाटात सुमारे 25 मीटर लांबीचा रस्ता खचला. त्यामुळे एका बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. गुरुवारी रात्री उशीरापर्यंत काम सुरु होते.

पावसाने उघडीप दिल्यानंतर रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. कसारा घाटात नेहमीच होणारी वाहतूक कोंडी आणि दरड कोसळण्याचे प्रकार घडतात. यामुळे घाटातच स्वतंत्र दुहेरी मार्ग तयार करण्यात आल्याने वाहतूक कोंडीसारख्या घटनांपासून वाहनधारकांची सुटका तर झालीच शिवाय मुंबईचे अंतरही कमी झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच नाशिककडून मुंबईकडे जाताना कसारा घाटात उतारावरच रस्ता खचल्याने वाहनधारकांची पंचाईत झाली आहे. 

वेबदुनिया वर वाचा