गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास सिडको एमआयडीसी पसिसर मोठ्या आवाजाने हादरला. स्पोटाची तीव्रता मोठी असल्याने ही महिला 10 ते 15 फूल लांब फेकली गेली. कंपनीमधून टाकण्यात आलेल्या वेस्टेज केमिकलचा हा स्फोट असल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्पोटानंतर घटनास्थळी गुप्तचर संस्था, दहशतवादी प्रतिबंधक पथकांनी तसेच पोलिसांनी पाहाणी केली.