औरंगाबादचा शुभम ‘एआयईईई’मध्ये देशात पहिला!

वेबदुनिया

सोमवार, 6 जून 2011 (15:54 IST)
अखिल भारतीय अभियांत्रिकी प्रवेशपूर्व परीक्षेत (एआयईईई) औरंगाबादचा शुभम ललवाणी देशामध्ये अव्वल ठरला आहे. राष्ट्रीय स्तरावरील या परीक्षेत त्याने 360 पैकी 345 गुण प्राप्त केल़े

बारावीनंतर आयआयटी आणि एआयईईई या दोन परीक्षा महत्त्वाच्या आहेत़ दोन्ही परीक्षेत शुभमने नेत्रदीपक यश मिळविले आहे. आयआयटी परीक्षेत तो देशपातळीवरील यादीत 93 वा गुणवंत ठरला. येथील मौलाना आझाद विज्ञान महाविद्यालयाचा तो विद्यार्थी आहे. शिवाय जिनेश संजय पापडीवाल हा एआयईईईमध्ये राज्यात 48 व्या क्रमांकाने तर देशपातळीवरील सर्वसाधारण गुणवत्ता यादीत तो 396 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.

वेबदुनिया वर वाचा