एलबीटी रद्दच्या अपेक्षांना मुख्यमंत्र्यांचा ‘ठेंगा’

बुधवार, 26 नोव्हेंबर 2014 (12:23 IST)
एलबीटीला सक्षम पर्याय मिळाल्यानंतर ती रद्द करणार असल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यापार्‍यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. एलबीटी रद्द करण्याची सरकारची भूमिका असून त्यासाठी पर्यायाची चाचपणी सुरु आहे, अशी सारवासारव करीत एलबीटीची वसुली सुरु रहाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसांच्या पुणे दौर्‍यावर आले आहेत.
त्यांनी पत्रकरांशी बोलताना यावरील भूमिका स्पष्ट केली. येत्या सहा महिन्यांत वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी लागू होणार आहे. त्यानंतर अपोआपच इतर कर रद्द होतील, असे सांगून त्यांनी या प्रश्नावर पुर्णविराम दिला आहे.

वेबदुनिया वर वाचा