उपमुख्यमंत्री अजीत पवारांचा राजीनामा

वेबदुनिया

मंगळवार, 25 सप्टेंबर 2012 (18:37 IST)
FILE
सिंचन प्रकल्पातील घोटाळ्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजीत पवार यांनी आज (मंगळवार) आपल्या पदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री पृथ्‍वीराज चव्हाण यांना त्यांनी राजीनामा पाठवला आहे.

निविदा शिवाय आपल्या लोकांना सिंचन परियोजनांचे कामं दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. राज्यभरातील सिंचन प्रकल्पांमध्ये कोट्यावधी रूपयांच्या घोटाळ्याच्या आरोपांनंतर चौकशीसाठी आज जनहित याचिका दाखल करण्यात आली. या प्रकरणात आपण टार्गेट झाल्याचे पाहिल्यानंतर पवार यांनी याप्रकरणी नि:पक्षपातीपणे चौकशी व्हावी म्हणून आपण राजीनामा देत असल्याचे सांगितले.

वेबदुनिया वर वाचा