उद्यापासून दहावीची परीक्षा

वेबदुनिया

बुधवार, 29 फेब्रुवारी 2012 (15:45 IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्‍या दहावीच्या परीक्षेला उद्यापासून (१ मार्च)पासून पारंभ होत आहे. परीक्षेला मुंबई विभागात ३ लाख ७३ हजार ३१३ विद्यार्थी बसले आहेत. त्यात २ लाख २ हजार ९३७ विद्यार्थी आणि १ लाख ७0 हजार ३७६ विद्यार्थिनी आहेत. मुंबई विभागात ३२४ परीक्षा केंद्रे आणि ६६१ उपकेंद्रे आहेत. इंग्रजी तृतीय भाषा व गणित, सामान्य गणित या विषयांकरिता प्रचलित बहुसंची प्रश्नपत्रिका असणार आहे. तसेच परीक्षा काळातील गैरप्रकार रोखण्यासाठी ‘गैरमार्गाशी लढा’ या अभियानाचा कृतीकार्यक्रम यंदाही मंडळाने आखला आहे.परीक्षेच्या काळात विद्यार्थी मानसिक दडपणाखाली असतात, अशा विद्यार्थ्यांसाठी मुंबई विभागाने 0२२, २७८९३७५६ हा हेल्पलाईन दूरध्वनी दिला आहे.

वेबदुनिया वर वाचा