आरएसएसमध्ये महिलांना प्रवेश हवाच : तृप्ती देसाई

मुंबई- राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (आरएसएस) महिलांना प्रवेश हवाच, असे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.
 
तृप्ती देसाई यांनी शनिशिंगणापूर, कोल्हापूरची महालक्ष्मी, त्र्यंबकेश्वरचे ज्योतिर्लिग व हाजी अली दर्गानंतर आता ‘आरएसएस’वर लक्ष केंद्रित केले आहे. त्या म्हणाल्या, ‘भारतीय जनता पक्ष हा महिलांच्या मतदानामुळे सत्तेवर आला आहे. संघ हा भाजपशी संलग्न आहे, यामुळे महिलांना संघामध्ये प्रवेश मिळायलाच हवा. संघप्रमुख मोहन भागवत यांना लवकरच याबाबत पत्र लिहिणार आहे.’
 
‘तृप्ती देसाई या महिलांचे विषय पुढे करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत, असे भाजपचे कांता नलावडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, भूमाता ब्रिगेडच्या चार हजार महिला सभासद आहेत.

वेबदुनिया वर वाचा