अवकाळी पावसाचे पुन्हा ढग?

गुरूवार, 9 एप्रिल 2015 (11:12 IST)
पश्चिम महाराष्ट्रात धूळीच्या वादळानंतर आता पुन्हा ढगाळ हवामान निर्माण झाले आहे. वातावरणात सातत्याने बदल होत असून विदर्भात पावसाची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे.

मुंबईत सध्या ढगाळ हवामान आहे. असे असले तरी पारा वाढला असून दमट हवामानामुळे मुंबईकरांना घामाच्या धारा लागल्या आहेत. या उलट विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला. अमरावती व नांदेड जिल्ह्याला बुधवारी वादळी वाºयासह गारपिटीने तडाखा दिला.  महालिंगी (जि. नांदेड) येथे वीज पडून एकाचा मृत्यू झाला.

वेबदुनिया वर वाचा