मनाचा मोठेपणा आणि शिवसैनिकांबद्दलच्या प्रेमाचा अरविंद भोसले यांनी पुन्हा एकदा प्रत्यय आणून दिला आहे. साडेपाच तोळ्याच्या आणि सव्वा लाख रुपये किंमत असलेल्या सोन्याच्या चपला भोसले यांनी शिवसैनिक रमेश गोवेकर यांच्या कुटुंबियाना अर्पण केल्या. शिवसेनेच्या प्रचार करताना 2005 मध्ये सिंधुदुर्गमधले रमेश गोवेकर यांचा मृत्यु झाला होता.
दरम्यान, नारायण राणे शिवसेनेत असताना त्यांचे पीए असलेले रमेश गोवेकरांनी त्यांच्यासोबत शिवसेना सोडण्यास स्पष्ठ नकार दिला होता. रमेश गोवेकर 2005 च्या निवडणूक प्रचारात बेपत्ता झाले होते. नोव्हेंबर 2005 मध्ये मालवण किल्ल्याजवळ गोवेकरांचा मृतदेह आढळला होता. असे गोवेकर कुटुंबियांनी म्हटले आहे. या प्रकरणी कोर्टात सुनावाणी प्रलंबित आहे.