अण्णा हजारे यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. नेवासा (जि. अहमदनगर) येथून अंबादास लष्करे याच्या नावाने ही धमकी देण्यात आल्याची माहिती अण्णांच्या निकटवर्तीयांकडून मिळाली आहे.

अण्णा हजारे यांना सतत धमकी मिळत असल्याने याप्रकरणी पारनेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती अण्णा हजारे यांच्या निकटवर्तीयांकडून दिली आहे. गेल्या 33 महिन्यांत 15 वेळा अशा गंभीर स्वरुपाची धमकी देण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा