टाटा मोटर्सचा जमशेदपूर प्रकल्‍प 28 पासून बंद

वार्ता

बुधवार, 24 डिसेंबर 2008 (20:58 IST)
आर्थिक मंदीच्‍या कारणांमुळे मागणी जोरदार घसरल्‍याने देशातील सर्वांत मोठ्या वाहन निर्माती कंपनी टाटा मोटर्सने जमशेदपूर वाहन प्रकल्‍पात चौथ्‍यांदा 'ब्लॉक क्लोजर'ची घोषणा केली आहे.

कंपनीचे प्रवक्ते पी.जे. सिंह यांनी या बंदची आज औपचारिक घोषणा करताना ऑटो क्षेत्रात कर्ज देणे बंद करण्‍यात आल्‍याने आणि मागणी कमी झाल्‍याने दि.28 ते 31 डिसेंबरपर्यंत बंद पाळण्‍यात येणार असल्‍याचे जाहीर केले आहे.

वेबदुनिया वर वाचा