जागतिक मंदीच्या विळख्यात अडकलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी केंद्र सरकारने 20 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. या पॅकेजअंतर्गत लहान उद्योगांना अनेक सवलती देण्यात येणार असून उद्योग सुरू करण्यासाठी 1 कोठी रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. या शिवाय सेंट्रल वॅटमध्ये 4 टक्के सवलती दिल्या जाणार आहेत.
सरकारने 5 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जाच्या व्यवजदरातही खास सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय निर्यातीला प्राधान्य देण्यासाठी 350 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.