टाटांच्या आणखी एका कंपनीत' ब्लॉक क्लोजर'

वार्ता

मंगळवार, 2 डिसेंबर 2008 (17:34 IST)
जागतिक आर्थिक मंदीचा चांगलाच फटका टाटा उद्योगाला बसला असून, टाटांच्या जमशेदपूर येथील आणखी एका कंपनीत चार दिवसांसाठी ब्लॉक क्लोजर जाहीर करण्यात आल्याने उद्योग जगतात चिंतेचे वातावरण आहे.

टाटांच्या जमशेदपूर येथील टेल्को कंन्स्ट्रक्शन इक्विपमेंट कंपनीने आज चार दिवसांसाठी कंपनीत काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

या कंपनीत टाटांची 60 टक्के तर जपानच्या हिताची कंपनीची 40 टक्के गुंतवणूक आहे. या कंपनीने आर्थिक मंदीचा फटका बसल्यानंतर उत्पादनात 50 टक्के कपात केली आहे. टेल्कॉन वर्कर्स युनियनचे अध्यक्ष रामचंद्र यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

वेबदुनिया वर वाचा