आर्थिक मंदीने परमेश्वराची आठवण !

सोमवार, 8 डिसेंबर 2008 (18:03 IST)
आर्थिक मंदीने लोकांना अडचणीत आणले असताना आगतिक झालेल्या लोकांनी आता परमेश्वराच्या दारी धाव घेतली आहे. इंग्लंडमध्ये चर्चमध्ये येणार्‍या भाविकांची गर्दी कधी नव्हे ते अचानक वाढली आहे. चर्च ऑफ इंग्लंडनेच ही माहिती दिली आहे.

चर्चमधील धर्माधिकार्‍यांच्या मते या मंदीने लोकांना आता त्यांच्या मुल्यांचाच पुनर्विचार करायला लावला आहे. चर्चच्या सेवेत एक रविवार या उपक्रमात गेल्या सप्टेंबरमध्ये ३७ हजार नव्या सदस्यांनी हजेरी लावली. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा दुप्पट आहे.

हा काळ परिणामांचा आहे. आयुष्यात खूप मोठा धक्का बसल्याने बरेच लोक पुन्हा एकदा चर्चकडे वळू लागले आहेत, असे सांगून आर्चबिशप रेव्हरंड कॅनॉन पॉल बायस म्हणाले, की मूल झाले, अथवा लग्न झाले की किंवा आयुष्यातील जवळची व्यक्ती सोडून गेली, की लोक चर्चमध्ये जातात. सध्याचा आर्थिक पेचप्रसंगही असाच आहे.

वेबदुनिया वर वाचा