कुराणवाणी : जाइज व नाजाइज

‘तुम्ही आपसात एकदुसर्‍याची मालमत्ता अयोग्य मार्गाने खाऊ नका आणि ती शासकाच्या गरजेपोटी देऊ नका. की जाणूनबुजून दुसर्‍याच्या  मालाचा काही भाग, त्यांचा हक्क हिरावून घेऊन तुम्हाला खावयाची संधी मिळावी.’ अल्लाह अआला सूरह बकरमध्ये फर्मावले आहे. (सूरह: 2-188 आयत) (जाइज व नाजाइज) उचित व अनुचितमध्ये तारतम्य करण्यास शिकवितो आणि अल्लाहच्या मर्यादांचे पालन करण्याची   शिकवण देतो. 
 
‘शरीअत’ म्हणजे धर्मशास्त्र नियमावली, कायदा. जाइज म्हणजे योग्य, उचित, सनदशील, नियमानुकूल, बरोबर, अचूक व नाजाइज म्हणजे हे जाइजच्या विरुध्दार्थी शब्द आहे. नको त्या मार्गाने लोकांचे धन, जागा, पैसे वगैरे-वगैरे अनुचित मार्गाने लुटणे (गीळंकृत) करणे. हे सारे नाजाइज मार्ग आहेत. स्वत:च श्रमाने कमविणे अर्थात जाइज कमाईने, जाइज कमाईत सच्चई असायला हवी, त्याला खूप श्रम, परिश्रम घ्यावे लागतात, त्या घामात सच्चई असते. नाजाइज कमाईचे अनेक मार्ग आहेत. शरीअतच्या म्हणजे धर्मशास्त्राच्या नियमाने वागावे हीच पवित्र कुरआनाची शिकवण आहे. 
 
पवित्र कुरआन सार्‍या विश्वाला हेच सांगतो की, दुसर्‍याचे धन गीळंकृत करण्यासाठी किंवा दुसर्‍यांच्या वस्तूवर बेकादेशीर कब्जा करण्यासाठी लाचलुचपतीला साधन बनवू नका. नको त्या ठिकाणी जानिसार आणि लोकांचे हक्क हिरावून घेण्याचे लाच हे सर्वात मोठे साधन आहे. कायद्याचे संरक्षण करणार्‍यांना याची चटक लागली तर हक्काची शाश्वती शिल्लक राहत नाही. त्यांना पैशाच्या जोरावर कोणीही खरेदी करू शकतो. म्हणून ज्या समाजात लाचलुचपत बोकाळते त्या समाजाचे शासक अप्रामाणिक होतात आणि लोकांना त्यांने न्याय्य हक्कही लाच दिल्याशिवाय मिळू शकत नाहीत. इस्लामने लाच घेणे व देणे या दोन्ही गोष्टी हराम ठरविलेल्या आहेत. लाचलुचपतीचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी शासकवर्गाला नजराणा, भेटी वगैरे देणे आणि त्यांनी त्याचा स्वीकार करणे या दोन्ही गोष्टींना प्रतिबंध करण्यात आलेला आहे. 
 
म्हणजे तुम्ही चांगल्याप्रकारे जाणता की, लाच ही एक वाईट गोष्ट आहे. दुसर्‍याचे हक्क हिरावून घेणे आहे आणि ते एक गुन्ह्याचे कृत्य आहे. बुध्दीही त्याला गुन्हा समजते आणि शरीअतसुध्दा तला गुन्हा ठरवितात. हा गुन्हा आहे ही एक उघड वस्तु:स्थिती आहे. अशा उघड वाईटापासून अवश्य वाचले पाहिजे.
 
बदीऊज्जमा बिराजदार
 
(साबिर शोलापुरी)

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती