रामनवमी 2021: शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि कथा

बुधवार, 14 एप्रिल 2021 (21:29 IST)
रामनवमी 2021 शुभ मुहूर्त
 
रामनवमी मुहूर्त :11:02:08 ते 13:38:08 पर्यंत
अवधी : 2 तास 36 मिनिट
रामनवमी मध्याह्न काळ :12:20:09
 
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रामनवमी साजरी केली जाते. श्रीराम प्रभू विष्णूंचे सातवे अवतार होते. दरवर्षी हिन्दू दिगदर्शिकेनुसार चैत्र मास च्या नवमी तिथीला श्रीरामनवमी रुपात साजरा केला जातो. चैत्र मासाच्या प्रतिपदा पासून नवमी पर्यंत नवरात्री साजरी केली जाते. या दरम्यान लोक व्रत करतात. 
 
रामनवमी उत्सव
श्री रामनवमी हिन्दुंचा मुख्य सण आहे जे जगभरात भक्ती आणि उत्साहपूवर्क साजरा केला जातो.
1. या दिवशी भक्तगण रामायण पाठ करतात.
2. रामरक्षा स्तोत्र पाठ केला जातो.
3. अनेक जागी भजन-कीर्तन याचे देखील आयोजन केलं जातं.
4. रामाची मूर्ती सजवली जाते.
5. प्रभू रामाची मूर्ती पाळण्यात ठेवून झोका दिला जातो.
 
राम नवमी पूजा विधी
1. सर्वात आधी स्नान करुन पवित्र होऊन पूजा स्थळी पूजन सामुग्री जमा करून घ्यावी.
2. पूजेत तुळस पत्र आणि कमळाचं फुलं असावं.
3. नंतर श्रीराम नवमीची पूजा षोडशोपचार करावी.
4. खीर आणि फळ-मूळ प्रसादाच्या रुपात नैवेद्यात असावे.
5. पूजेनंतर सर्वांना कपाळावर तिलक करावे.
 
पौराणिक मान्यता
श्री रामनवमीची कहाणी लंकाधिराज रावण यापासून सुरु होते. रावण आपल्या राज्यात खूप अत्याचार करीत असे. त्यांच्या अत्याचारामुळे प्रजा कंटाळलेली होती. देवता देखील त्याच्या अहंकारामुळे त्रस्त होते कारण रावणाने ब्रह्मांकडून अमर होण्याचं वर मिळविले होते. त्याच्या अत्याचारामुळे परेशान देवतागणांनी प्रभू विष्णूंकडे जाऊन प्रार्थना केली. 
 
परिणामस्वरुप प्रतापी राजा दशरथ यांच्या कौशल्यापोटी विष्णू अवतार श्रीराम या रुपात जन्म घेतला. तेव्हापासून चैत्र नवमी तिथीला रामनवमी सण साजरा करण्याची परंपरा सुरु झाली. नवमीला तुलसीदार यांनी रामचरित मानसची रचना सुरु केल्याचंही म्हटलं जातं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती