1 या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून देवाची पूजा करावी. नंतर सण साजरा करण्याची तयारी करावी. घराला स्वच्छ करा. नंतर कुंकू, अक्षता, नारळ, मिठाई आणि निरांजन लावून ताट तयार करा. या ताटात रंग-बेरंगी राखी ठेवून त्याची पूजा करा.
2 भावाला पाटावर बसवा आणि एखादा चांगला मुहूर्त बघून बहिणीने भावाच्या कपाळावर कुंकूच टिळा लावून त्यावर अक्षता लावा आणि भावाच्या उजव्या मनगटावर रेशीम दोऱ्याने बनलेली राखी बांधून मिठाई खाऊ घाला. बहिणी राखी बांधताना आपल्या भावाच्या दीर्घायुष्य, सुख आणि प्रगतीची मंगलमयी इच्छा करतात.
3 यंदा 3 ऑगस्ट 2020 रोजी राखी साजरी होणार आहे. राखी बांधण्याचा मुहूर्त सकाळी 9 वाजून 30 मिनिटापासून सुरू होणार आहे. दुपारी 1 वाजून 35 मिनिटांपासून संध्याकाळी 4 वाजून 35 मिनिटापर्यंतचा मुहूर्त शुभ आहे. त्या नंतर संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटापासून घेऊन रात्री 9 वाजून 30 मिनिटापर्यंत देखील चांगला मुहूर्त सांगत आहे. भद्राकाळात राखी बांधायची नसते.
शास्त्रानुसार राखी बांधताना या मंत्राचा जप करावा - "येन बद्धो बलिराजा, दानवेन्द्रो महाबलः तेनत्वाम प्रति बद्धनामि रक्षे, माचल-माचल"