धनंजय महाडिकांना पहिल्या पसंतीची 27 मतं, अपक्षांची 9-10 मतं फुटल्याचा अंदाज
शनिवार, 11 जून 2022 (11:43 IST)
राज्यसभा निवडणुकीवरुन महाराष्ट्रामध्ये मोठे नाट्य पाहण्यास मिळाले आहे. अखेरीस 9 तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आला आहे. कोल्हापूरमधून धनंजय महाडिकच हे कोल्हापूरचे 'पैलवान' ठरले आहे. धनंजय महाडिक विजयी झाले आहे. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार पराभूत झाले आहे.
पीयूष गोयल, अमरावतीमधून अनिल बोंडे आणि कोल्हापूरमधून यांना उमेदवारी दिली होती. भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहे. तर धनंजय महाडिक सुद्धा विजयी झाले आहे.
भाजपचे संख्याबळ 122 इतकी होते. राज्यसभेचे दोन उमेदवार निवडून आणल्यानंतर भाजपकडे 28 मते राहत होती. पण, पीयूष गोयल यांना 48 मतं मिळाली आणि अनिल बोंडे यांनाही 48 मतं मिळाली.
त्यानंतर पहिल्या पसंतीची 27 मतं ही धनंजय महाडिक यांना मिळाली आहे. तर महाडिक यांच्याविरोधात उभे असलेले शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना 33 मतं मिळाली आहे. त्यामुळे अपक्षांची 9 ते 10 मतं फुटली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.