मसाला राजमा

ND
साहित्य : 250 ग्रॅम राजमा, 2 कांदे चिरलेले, 1 कप दही, 2 कप कापलेली हिरवी मिरची, हळद, गरम मसाला, तिखट प्रत्येकी अर्धा चमचा, 1 चमचा धने पूड, 1 चमचा क्रीम, 2 मोठे चमचे तेल, 1 चिमटी सोडा, 1 तुकडा कापलेलं आलं, मीठ चवीनुसार.

कृती : राजमाला रात्री सोडा मिसळलेल्या पाण्यात भिजत घालावे. त्याच पाण्यात सकाळी उकळावे. फ्राइंग पैनमध्ये तूप गरम करून कांदा फ्राय करून त्यात आलं व हिरवी मिरची घालून दोन मिनिट परतावे. दह्याला घोटून त्यात हळद, धने पूड, मीठ व तिखट घालावे. एक मिनिटांनंतर पाण्यासहित राजमा डाळीत टाका आणि हलकेसे घोटा. दोन वेळा उकळी आल्यावर गरम मसाला, क्रीम टाकून काही वेळ झाकून ठेवा नंतर साध्या भात किंवा फुलक्यांसोबत वाढावे.

वेबदुनिया वर वाचा