वसंत पंचमी स्पेशल: केशरी भात

साहित्य: 1 वाटी तांदूळ, अर्धा वाटी साखर, 4 केशर काड्या 1 चमचा दूधात चुरुन घ्याव्यात, दोन चिमटी खाण्याचा पिवळा रंग (पाव टीस्पून पाण्यात कालवून), 4 लवंगा, 4 वेलच्या, मनुका, सुके मेवे, दोन टेबलस्पून तूप.  
 
कृती: अर्धा तास तांदूळ भिजवून ठेवा. एका पॅनमध्ये तूप घालून लवंगा, वेलची परतून त्यात तांदूळ मिसळा. केसर आणि दुप्पट गरम पाणी घालून उकळी घ्या. उकळ्यावर रंग, साखर आणि मनुका घाला. तांदूळ शिजल्यावर (8 ते 10 मिनिट) सुके मेवे घालून सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा