चविष्ट पालक पनीर भाजी

शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (20:30 IST)
साहित्य - 
 
10 कप किंवा 4 जुड्या चिरलेला पालक, दीड कप पनीर तुकडे केलेलं, 2 चमचे तेल, 3/4 कप बारीक चिरलेला कांदा, 4 पाकळ्या लसणाच्या ठेचलेल्या,1 तुकडा आलं,2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 /2 चमचा हळद, 3/4 कप ताजी टोमॅटो प्युरी, मीठ चवीप्रमाणे, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे ताजे क्रीम.    
 
कृती -
 
एका भांड्यात पाणी उकळवून त्यात पालक घालून 2 ते 3 मिनिटे उकळवून घ्या. गाळून थंड पाण्याने धुऊन एकीकडे ठेवा. मिक्सर मध्ये वाटून पेस्ट करा. एका कढईत तेल गरम करून त्यामध्ये कांदा घालून मध्यम आचे वर सोनेरी होई पर्यंत परतून घ्या या मध्ये लसूण,आलं,हिरव्या मिरच्या ,हळद, टोमॅटो प्युरी घालून परतून घ्या.जो पर्यंत तेल सुटत नाही. या मध्ये पालकाची पेस्ट आणि 2 चमचे पाणी घालून चांगल्या प्रकारे मिसळून घ्या आणि मध्यम आचेवर 2 मिनिटासाठी शिजवून घ्या. शिजताना गरम मसाला, मीठ आणि  ताजे  क्रीम घाला या मध्ये पनीरचे काप केलेले तुकडे घालून हळुवार पणे मिसळा आणि एक उकळी द्या. पालक पनीर तयार. गरम पालक पनीर पोळी सह सर्व्ह करा.
 
टीप : आपली इच्छा असल्यास पनीर तळून देखील घालू शकता.

वेबदुनिया वर वाचा