मुळ्याचा चटका

MH Govt
MHNEWS
साहित्य : २ वाटय़ा मुळ्याचा कीस, पाऊण वाटी भिजलेली चणाडाळ, ४-५ हिरव्या मिरच्या, एक छोटा आल्याचा तुकडा, १ वाटी सायीचे फेटलेले दही, हळद, मीठ.

फोडणीसाठी : तेल, मोहरी, सुक्या लाल मिरच्या, हिंग.

कृती : प्रथम बाऊलमध्ये मुळ्याचा कीस पिळून घ्यावा, त्यामुळे मुळ्याचा उग्र वास लपतो.भिजवलेली चणाडाळ, हिरवी मिरची, आल्याचा तुकडा मिक्सरमधून जाडसर वाटून मुळ्याच्या किसात घालावी. नंतर मीठ, साखर, कोथिंबीर, फेटलेले दही, हळद घालून मिक्स करावे. त्याला वरून तेलाची मोहरी, हिंग, सुक्या लाल मिरच्या घालून खमंग, चरचरीत फोडणी द्यावी. वाढताना कोथिंबीर घालून सजवा.

वेबदुनिया वर वाचा