विद्यापीठाच्या मेस मधील जेवणात अळी आणि केस आढळले

रविवार, 10 मार्च 2024 (16:17 IST)
पुणे विद्यापीठातून एक धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार समोर आला आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठातील मेस मध्ये विद्यार्थी खात असलेल्या पोह्यांमध्ये अळी आणि उपीट मध्ये केस आढळल्याचे प्रकार समोर आले आहे. या मुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 
 
पुणे विद्यापीठाच्या भोजनगृहातील विद्यार्थ्यांसाठी सकाळी दिलेल्या न्याहारी मध्ये पोह्यांमध्ये अळी आणि उपीट मध्ये केस  आढळून आले आहे. या पदार्थांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या वर नेटकरी देखील आपापली प्रतिक्रिया देत आहे. संबंधित मेसचे कंत्राट रद्द करावे,अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.
 
पुणे विद्यापीठातील भोजनगृहातील गुणवत्ता ढासळत असल्याचे प्रश्न उद्भवत आहे. या प्रकारा नंतर विद्यार्थी आणि नेटकरी संताप करत आहे. या प्रकारा नंतर प्रशासनाने प्राध्यापकांचा समावेश असलेली उपहारगृह आणि भोजनगृह दक्षता समिती काय करत आहे असा प्रश्न उद्भवत आहे. यापूर्वीही विद्यार्थ्यांच्या जेवनात अळी निघाल्याची घटना घडली होती.  
 
विद्यार्थ्यांच्या जेवणात अळी सापडली. याबाबत मेसेज चालकाला विचारले असता, तांदळाचा नवीन कट्टा खराब निघाला. पुन्हा असे होणार नाही, मी तांदूळ बदलून टाकतो, असे त्याने विद्यार्थ्यांना सांगितले.त्यामुळे रिफ्लेक्ट्री चालकाचे कंत्राट रद्द करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा अळी निघाल्यामुळे विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.विद्यापीठात उपहारगृहांची संख्या कमी आहे.त्यामुळे अनेक विद्यार्थी नाईलाज म्हणून वसतीगृहातील मेस मध्ये जेवण करतात. विद्यापीठाने विद्यार्थ्यांना जेवणासाठीचे विविध पर्याय उपलब्ध करून द्यावेत, यासाठी अनेक वेळा आंदोलने झाली. परंतु, त्याची दखल घेतली गेली नाही, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
 
Edited By- Priya Dixit  
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती